Home राजधानी मुंबई विधान परिषदेत दिवंगत सदस्यांना आदरांजली

विधान परिषदेत दिवंगत सदस्यांना आदरांजली

72

मुंबई : बिहार व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी विधान परिषद सदस्य राम दत्तात्रय प्रधान, माजी राज्यमंत्री व विधान परिषद सदस्य विनायकराव पुंडलिकराव पाटील आणि माजी विधान परिषद सदस्य संदेश लक्ष्मण कोंडविलकर यांच्या दु:खद निधनाबद्दल संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी शोकप्रस्ताव सादर केला. या प्रस्तावान्वये विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवंगतांना भाषणातून आदरांजली अर्पण केली.

सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, की देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे हे दिवंगत नेते होते. राम प्रधान यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. विनायकराव पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत त्यांना कृषिभूषण पुरस्कार तर, वनक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वनश्री आणि प्रियदर्शनी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. कोंडविलकर यांचेही सामाजिक कार्य उल्लेखनीय होते.

यावेळी उपसभापती डॉ. निलम गोºहे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सदस्य सर्वश्री शरण रणपिसे, नरेंद्र दराडे, भाई गिरकर आदींनीही माजी दिवंगत सदस्यांना भाषणातून श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here