Home राजधानी मुंबई विधानपरिषद नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

विधानपरिषद नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

86

मुंबई  : महाराष्ट्र विधानपरिषदेवर धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे नवनिर्वाचित सदस्य अमरिश रसिकलाल पटेल ( amarish patel ) यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत विधान भवनातील त्यांच्या दालनात मंगळवारी पार पडलेल्या या शपथविधी समारंभास विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि दोन्ही सभागृहातील इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, अनुराज कुडतरकर, अवर सचिव उमेश शिंदे, रवींद्र जगदाळे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा नवनिर्वाचित सदस्य गोपिचंद कुंडलिक पडळकर यांचा विधानपरिषदेत संसदीय कार्यमंत्री अ‍ॅड.अनिल परब यांनी परिचय करून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here