Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनी पाहुणे

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनी पाहुणे

36

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन 70 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 27 नोव्हेंबरला फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान जॉन्सन यांना आमंत्रित केले होते.

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब भारत दौºयावर असून त्यांनी आज एस. जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर या बातमीला दुजोरा दिला. ते म्हणाले, की पंतप्रधान जॉन्सन यांनी देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारल्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांमधील एका नव्या युगाचे प्रतीक असेल. आम्हाला भारताशी आर्थिक संबंध बळकट करायचे आहे. दहशतवाद आणि कट्टरतावादामुळे उद्भवणारे आव्हाने समान आहेत. दरम्यान, यापूर्वी जॉन मेजर 1993 मध्ये नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here