Home मुंबई मराठा आरक्षण देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवारांचे मोठे वक्तव्य

मराठा आरक्षण देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवारांचे मोठे वक्तव्य

21

* आरोग्य विभागासाठीच्या निधीसंदर्भात तडजोड नाही
* मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर ठाम

राज्यातील कोराना संकटाचा सामना करण्यात राज्य सरकार कमी पडलेले नाही. सरकारच्या सर्व यंत्रणा व जनता सर्वशक्तीनिशी कोरोनाशी एकजुटीने लढत आहे. हा लढा पुढेही सुरू राहील. या लढ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar In Assembly : ‘चांद्या पासून बांद्या’पर्यंत महाराष्ट्र एकच आहे़ त्यामुळे निधीवाटपात कोणत्याही प्रदेशावर अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही. राज्यातील जनतेला समान न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर राज्य सरकार ठाम आहे. त्यासाठी सर्वशक्तिनिशी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, की राज्यावर आलेले कोरोनाचे संकट अभूतपूर्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या प्रत्येक घटकाने या संकटाचा खंबीरपणे सामना केला आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांनी यात मोलाची कामगिरी बजावली आहे. नागरिकांनीही सरकारला चांगली साथ दिली आहे. केंद्रीय पथकाने दिलेल्या संभाव्य रुग्णवाढीच्या इशाºयानुसार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसारच राज्यात ‘जम्बो कोविड’ रुग्णालये उभारली होती. घेतलेल्या आवश्यक खबरदारीमुळे ही साथ नियंत्रणात आली आहे. परिणामी रुग्ण संख्या घटल्याने काही कोरोना सेंटरमध्ये पूर्ण क्षमतेने रुग्ण दाखल झाले नाहीत. मात्र, राज्यातील नागरिकांच्या जीवाचा विचार करूनच ही सर्व यंत्रणा उभारण्यात आली होती. कोरोना रुग्णांना आॅक्सिजनची कमतरता भासू नये सासाठी राज्यात तयार होणारा ८० टक्के आॅक्सिजन रुग्णालयांना तर उर्वरित २० टक्के आॅक्सिजन उद्योगांना देण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागाला आवश्यक असणारा निधी वेळोवळी देण्यात आला. तसेच, आमदारांच्या स्थानिक विकास निधीत दोन कोटीवरून तीन कोटी रुपये वाढ करण्यात आली. डोंगरी विकास निधीसह कोणत्याही महत्त्वाच्या विभागाच्या निधीत कपात करण्यात आलेली नाही.

आरोग्य विभागातील रिक्तपदांच्या भरतीलाही मान्यता देण्यात आलेली आहे़ यापुढेही आरोग्य विभागासाठीच्या निधीसंदर्भात तडजोड केली जाणार नाही, आवश्यक निधी दिला जाईल. कोरोना काळातील कामात कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(file photo)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here