Home राजधानी मुंबई प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

68

CM Udhhav Thakare In Winter Assembly :  प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.

मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता यासोबतच येणाºया भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल. टप्प्या-टप्प्याने प्राचीन मंदिरांचा विकास करण्यात येणार असून त्यात कोणत्या मंदिरांचा समावेश करायचा याबाबत सभागृहाच्या सदस्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्वोच्च न्यायालयातील लढा सर्वांच्या सहकार्यातून निश्चितच जिंकू असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, की मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाच्या भूमिकेत अजिबात बदल झालेला नसून पूर्वीचे वकीलही बदलण्यात आलेले नाहीत. मराठा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा सुरू आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देताना ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही, हा आपला शब्द असल्याचेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

मराठा आरक्षण देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवारांचे मोठे वक्तव्य

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here