Home राजधानी मुंबई रोजगार मेळाव्यातून नोव्हेंबरअखेर 1.32 लाख रोजगार

रोजगार मेळाव्यातून नोव्हेंबरअखेर 1.32 लाख रोजगार

46

मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले आॅनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत नोव्हेंबरअखेर एकूण 1 लाख 32 हजार 308 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. यावर बेरोजगार उमेदवारांकडून शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदींबाबत नोंदणी केली जाते. शिवाय कंपन्या, उद्योजक, कॉपोर्रेट्स यांनाही नोंदणी करून उमेदवार शोधता येते.

नोंदणी इतकी
मुंबई विभाग १३ हजार २८४
नागपूर विभाग १ हजार २२७
नाशिक विभाग ४ हजार ४६
पुणे विभाग ९ हजार २११
औरंगाबाद विभाग ६ हजार २३
अमरावती विभाग १ हजार ४२३

नोकरी मिळालेले
मुंबई विभाग ९ हजार ९२३
नागपूर विभाग १५५
नाशिक विभाग १ हजार १४१
पुणे विभागात ४ हजार ०६८
औरंगाबाद विभाग ७७२
अमरावती विभाग ३२१

 

ऑनलाईन महारोजगार मेळावा २० डिसेंबरपर्यंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here