Home मुंबई विवाहसंकेतस्थळावरील नोंदणीसंबंधी सावधतेचा इशारा

विवाहसंकेतस्थळावरील नोंदणीसंबंधी सावधतेचा इशारा

34

मुंबई : विवाहसंकेतस्थळावर वैवाहिक जोडीदाराच्या निवडीची नोंदणी करताना त्या माध्यमातून आलेले विवाह प्रस्ताव अतिशय पारखून घ्यावेत़ फसवणुकीचे प्रकार लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार करावी, अशी सूचना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केली.

मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या विवाहसंकेतस्थळावर (मॅट्रिमोनिअल साईट) होणाºया सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर आॅनलाईन वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पोलिस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आदी उपस्थित होते.

फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून आपण मित्र- मैत्रिणी, नातेवाईक तसेच विविध माध्यमातून ओळखी झालेल्या लोकांच्या संपर्कात राहत असतो. काही वेळेस फक्त एखादी व्यक्ती आपल्या सोशल मीडियावरील फ्रेंडलिस्टमध्ये आहे किंवा चांगल्या स्वभावाची वाटत आहे म्हणून कोणतीही सावधगिरी न बाळगता त्या व्यक्तीच्याही संपर्कात येतो. बहुदा अशाप्रकारे महिलांसंदर्भात सायबर गुन्ह्यांची सुरुवात होत असते. त्यामुळे तंत्रज्ञान शिकत असताना त्याचा वापर करत असताना आपल्या खाजगी व व्यक्तीगत जीवनाविषयी कोणत्या व्यक्तीला किती माहिती द्यावी. अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून महिलांनी अधिक जागरुक राहणे आवश्यक असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here