मौजा वाठोडा येथील भूसंपादन प्रकरणाची तपासणी करावी

उपराजधानी नागपूर राजधानी मुंबई

नागपूर / मुंबई : मौजा वाठोडा खसरा येथील शेत जमिनीचे भूमिसंपादन प्रकरण तसेच नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाने सिम्बायोसिस या शैक्षणिक संस्थेला दिलेल्या इमारत संदभार्तील प्रकरणाबाबतची कार्यवाही त्वरीत करावी. या प्रकरणाची शहानिशा करून याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.

मौजा वाठोडा येथील नकाशाच्या मंजुरीसंदर्भात प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने विधानभवन येथे बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महानगरपालिका आयुक्त श्री.ठाकरे, आयुक्त बी. राधाकृष्णन्, नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे, पी.जी. जाधव, एमएमआरडीए’ चे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अर्जदारांनी आपल्या समस्या मांडून सिम्बायोसिस संस्थेने सादर केलेली कागदपत्रे, त्यानुसार नकाशाला दिलेली मंजुरीबाबत फेरतपासणी करत चौकशी करावी, अशी मागणी केली. या प्रकरणाच्या वस्तुस्थितीची तपासणी करून योग्य कार्यवाही करावी, अशा सूचनाही विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी दिल्या.
यावेळी नागपूरचे नगरसेवक संजय महाकाळकर, वेदप्रकाश आर्य, प्रफुल्ल गुडघे, दुणेश्वर पेठे, जि.प. सदस्य अवंतिका लेकुरवाळे, नीलिमा घुगे, साई पाध्ये व अन्य सिम्बोसिसचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *