Home ब्लॉग महाराष्ट्राची भाग्यरेषा : कोयना जल वीज प्रकल्प

महाराष्ट्राची भाग्यरेषा : कोयना जल वीज प्रकल्प

94

सह्याद्रीच्या पोटातून बोगदे काढून हे पाणी, पोटातच गुहेप्रमाणे खोदलेल्या भल्यामोठ्या पॉवरहाऊसपर्यंत जाते व टर्बाईन्स फिरवून मग दुसºया बोगद्याने पुढे जाऊन कोकण बाजूला उतरते व मग पश्चिम वाहिनी वसिष्ठी नदीतून वाहत जाऊन अरबी समुद्रात जाते. म्हणजे नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे उलटा फिरवलेला आहे. हे कोयना प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.

भाग पहिला

कोयना जलविद्युत प्रकल्पाला ( koyna project ) महाराष्ट्राची ‘भाग्यरेषा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्युतप्रकल्प असलेल्या या जलविद्युत केंद्रावर राज्यातील अनेक उद्योग व्यवसाय आधारलेले आहेत. पावसाळ्यात वाहणारे पाणी एका धरणात साठवले जाते, व नंतर तेच पाणी उन्हाळ्यात वापरले जाते. साधारणत: धरणाच्या उंचीपासून किंवा पाण्याच्या पातळीपासून जनित्रापर्यंतची उंची 25 ते 2500 मीटर इतकी असते. या विद्युत प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण उद्भवत नाही, यामुळे या प्रकल्पाचा पर्यावरणास कोणत्याही प्रकारचा धोका नाही. या विद्युत प्रकल्पाची एक त्रुटी ही आहे, की या प्रकल्पास फार मोठी जागा लागते. तसेच, धरणात साठवलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. जास्तीत जास्त उंचीवरून वाहणाºया पाण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीजनिर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असे त्याचे तत्त्व आहे. कारण या प्रकारात स्थितिज ऊर्जा ही गतिज ऊर्जेत बदलते. या तºहेने केलेल्या विद्युतनिर्मितीला जलविद्युत ऊर्जा असे म्हणतात.

 

जलविद्युत प्रकल्प म्हटला म्हणजे एखाद्या नदीवर धरण बांधून, पाणी अडवून, मोठा जलाशय निर्माण केला जातो. मग त्या जलाशयातील पाणी पाईपने टर्बाईनपर्यंत नेऊन त्याच्या जोरावर टर्बाईन फिरते व नंतर ते पाणी त्या नदीच्याच पात्रात सोडले जाते. टर्बाईनने फिरवलेल्या जनित्रामुळे विद्युतनिर्मिती होते. कोयना ही पूर्ववाहिनी नदी अशा ठिकाणी आहे की तेथून महाराष्ट्रातील उत्तर-दक्षिण सह्याद्री घाटमाथाजवळ आहे. येथे बांधलेल्या धरणाने प्रचंड मोठा जलाशय निर्माण झाला आहे. सह्याद्रीच्या पोटातून बोगदे काढून हे पाणी, पोटातच गुहेप्रमाणे खोदलेल्या भल्यामोठ्या पॉवरहाऊसपर्यंत जाते व टर्बाईन्स फिरवून मग दुसºया बोगद्याने पुढे जाऊन कोकण बाजूला उतरते व मग पश्चिम वाहिनी वसिष्ठी नदीतून वाहत जाऊन अरबी समुद्रात जाते. म्हणजे नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे उलटा फिरवलेला आहे. हे कोयना प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.

प्रचंड प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या मुंबई आणि तिचा परिसर यांच्या विद्युत शक्तीच्या सततच्या वाढत्या मागणीमुळेच मुख्यत्वेकरून हा प्रकल्प आकारास आला. मुंबई शहर आणि भोवतालीचा भाग यांना बरीच वर्षे विजेचा तुटवडा भासत होता. दुसºया महायुद्धानंतरच्या घडामोडीमुळे तोच विजेचा तुटवडा अधिकच तीव्र होत गेला. विद्युत शक्तीची अत्यंत आवश्यकता होती. तसेच जागृत झालेल्या ग्रामीण भागाचा औद्योगिक विकास जिच्यावरच केवळ निर्भर आहे अशी स्वस्त विद्युत शक्तीची उपलब्धता अत्यावश्यक होऊन बसली होती. खरे पाहता टाटांनी सन 1915 मध्ये खोपोली येथे पहिले जलविद्युत केंद्र कार्यान्वित केले. त्यांनीच सन 1910 च्या सुमारास या प्रकल्पासंबंधी प्राथमिक पाहणी केली होती. सन 1914 ते 1918 च्या पहिल्या जागतिक युद्धानंतर सन 1930-31 मध्ये याच प्रकल्पाच्या पाहणीचे काम पुन्हा हाती घेण्यात आले; परंतु सन 1939 ते 1944 या कालावधीतील दुसºया महायुद्धाने या कामास खीळ पडली. युरोप खंडात 1910 ते 1950 या मध्यंतरीच्या कालावधीत विद्युत केंद्र भूगर्भात उभारणे आणि उच्च दाबाच्या जलवाहिन्या वापरणे इत्यादी बाबींच्या तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती. म्हणून ज्यावेळी 1945 साली मुंबईच्या ‘ग्रीड डिपार्टमेंट’ने या विद्युत प्रकल्पाच्या आखणीचे काम हाती घेतले, त्या वेळी शासकीय अभियंत्यांनी भूगर्भातील विद्युत गृहाच्या रचनेच्यादृष्टीने आवश्यक ती सर्व तपशिलवार माहिती जमविली. सखोल अभ्यास केला आणि स्विर्त्झलंडच्या तज्ज्ञांच्या आणि इतर सल्लागारांच्या मदतीने कोयना प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी सह्याद्रीच्या पोटात करण्याच्या प्रस्तावास सन 1953 मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळविली. या योजनेत कृष्णा व कोयना या नद्यांचे खोºयात पसरलेल्या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच्या क्षेत्रातील सिंचन योजना व शेती यासाठीही तरतूद करण्यात आली होती.

प्रवीण डोंगरदिवे
माहिती सहाय्यक
विभागीय माहिती कार्यालय,
कोकण विभाग, नवी मुंबई

(सौजन्य महासंवाद)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here