Home राजधानी मुंबई शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन

शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन

67

मुंबई : शिवसेना नेते तसेच माजी खासदार मोहन रावले यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. काही कामानिमित्त ते गोव्यात होते. रावले यांचे पार्थिव आज मुंबईतील राहत्या घरी आणले जाणार आहे.

मोहन रावले माजी खासदार असून दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात. दक्षिण मुंबईत आपला पक्ष रुजवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. वरिष्ठ नेत्यांपासून शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता.