Home राष्ट्रीय काँग्रेस पक्षात दोन मराठी नेत्यांना मोठी जबाबदारी

काँग्रेस पक्षात दोन मराठी नेत्यांना मोठी जबाबदारी

204

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने दोन मराठी नेत्यांना मोठी जबाबदारी दिली असून, यात पृथ्वीराज साठे आणि भाई जगताप यांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांची अ. भा. काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड केली आहे. तसेच, त्यांच्याकडे आसाम राज्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे, तर जगताप यांना मुंबई शहर अध्यक्ष देण्यात आले आहे.

पृथ्वीराज साठे यांनी सन 1992 मध्ये राष्ट्रीय स्टुडंस युनिअन आँफ इंडिया अर्थात एनएसयूआयच्या [ nsui ]  माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी निवडणूक लढवून विजय राखला होता. त्यानंतर अखिल भारतीय युवक काँगे्रसचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. 2007 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या कोअर ग्रुपचे ते सदस्य होते. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वय पदावर असताना कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही साठे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. दरम्यान, सन 2021 मध्ये आसाम विधानसभेची निवडणूक होत असून त्यादृष्टीने पृथ्वीराज साठे यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मुंबई शहराध्यक्ष भाई

भाई जगताप
भाई जगताप

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला होता. यानंतर पक्षाकडून
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. चरणसिंह सपरा कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

भाई जगताप यांच्यासह मनहास, चरणसिंग सपरा आणि नसीम खान हेदेखील अध्यक्षपदासाठी रांगेत होते. अखेर अध्यक्षपदाची माळ जगताप यांच्या गळ्यात पडली. विशेष म्हणजे ते काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडण्यात निष्णात आहेत.