Home राजधानी मुंबई पुढील सहा महिने सावध राहावे लागणार

पुढील सहा महिने सावध राहावे लागणार

65

chief minister udhhav thakare on public speech : अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. लस आली तरी पुढचे सहा महिने आपल्याला सावध राहण्याची, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ cm udhhav thakare ] यांनी केले.
युरोप आणि इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. नवीन वर्ष समोर आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना हे वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जाओ अशा शुभेच्छा आपण एकमेकांना देतो. त्या खºया ठरण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्तीने राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील 70 ते 75 टक्के लोक बाहेर फिरताना मास्क वापरताना दिसतात. उरलेले 25 टक्के लोक विनामास्कचेच फिरत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आणि समाजाला धोका होऊ शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

राज्यातील प्राचीन मंदिरांचा, तेथील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे राज्य शासनाने ठरवले असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात सर्वधर्मियांनी आपापल्या सण, समारंभात शिस्त पाळल्याने आणि जनतेने स्वयंशिस्तीचे पालन केल्याने आपण कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकलो आहोत.

सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे़ केंद्र सरकारकडून राज्याची हक्काची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी असताना आत्मविश्वासाने एकेक पाऊल पुढे टाकत राज्य शासनाने अनेक आपत्तीच्या प्रसंगात जनतेला, शेतकºयांना मदत दिली. कोरानाचे संकट, निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भातील पूरस्थिती, राज्यभरात अतिवृष्टीने झालेले नुकसान अशा अडचणींचा सामना करत राज्य विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
जगभर लॉकडाऊनने विकास प्रक्रिया थंडावली असताना महाराष्ट्र राज्याने औद्योगिक क्षेत्रात 65 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीला पसंती दिली. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या सामंजस्य करारातील 70 टक्के काम पूर्ण झाल्याचेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here