Home पूर्व विदर्भ रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ‘इको-प्रो’ ची मूक निदर्शने

रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ‘इको-प्रो’ ची मूक निदर्शने

42

चंद्रपूर: शहरातील एकमेव ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाचे [ ramala lake ] खोलीकरण व र्सौदर्यीकरणाच्या मागणीनिमित्ताने इको-प्रो च्या सदस्यांनी तलावाच्या काठावर मूक निदर्शने केली.
इको-प्रो संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने रामाळा तलावाच्या काठावर खोलीकरण तसेच सौंदर्यीकरणाच्या मागणीसाठी संस्था सदस्य, नागरिकांनी निदर्शनामध्ये सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, नितीन रामटेके आदी उपस्थित होते. सर्वांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन मागण्यांचे समर्थन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here