देशातील बिबटे काय म्हणतात़, पहा …

राष्ट्रीय

Leopards in India : देशातील बिबट वाघाची संख्या १२ हजार ८५२ इतकी असून २०१४ मधील आठ हजारांच्या तुलनेत त्यात संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी ‘स्टेटस आॅफ लिओपर्ड्स इन इंडिया 2018’अहवाल प्रसिद्ध केला.

भारतातील बिबट्यांची संख्या चार वर्षात 60 टक्यांनी वाढली आहे. मंत्री जावडेकर म्हणाले, की वाघ आणि सिंहांसारखेच बिबट्याची संख्या पाहता असे दिसून येते की हा वन्यप्राणी आपले पर्यावरण आणि जैवविविधतेचे चांगल्याप्रकारे रक्षण करीत आहे. अहवालानुसार, ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ पद्धतीने बिबट्यांच्या [ Leopards ] लोकसंख्येचा अंदाज लावण्यात आला. 2018 पर्यंत भारतात 12,852 बिबटे आहेत़ 2014 पासून त्यात 60 टक्के इतकी वाढ झाली.

देशात पहिली तीन राज्ये

– मध्य प्रदेश (3,421)
– कर्नाटक (1,783)
– महाराष्ट्र (1,690)

भारतीय उपखंडात शिकार होणे, अधिवासाची सोय, नैसर्गिक शिकार कमी होणे हे बिबट्यांसाठी मोठे धोके आहेत. देशातील प्रदेशानुसार वितरण केल्यास मध्य भारत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसह मध्य भारत आणि पूर्व भागातील जंगलांमध्ये सर्वाधिक 8 हजार 71 बिबटे आढळून आले. पश्चिम घाट प्रदेशातील कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि केरळ भागात 3 हजार 387 बिबटे आहेत. याविशाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहारसह शिवालिक आणि गंगेच्या मैदानी भागात 1 हजार 253 बिबटे आहेत, तर ईशान्य राज्यात केवळ 141 बिबट्यांची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *