Home राष्ट्रीय केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची कोरोना लशीसंबंधी घोषणा

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची कोरोना लशीसंबंधी घोषणा

70

ब्रिटनमधून कोरोनासंबंधी नवा धोका जाहीर झाला असताना तसेच कोरोना लशीसंबंधी दुष्परिणामाची चर्चा होत असतानाच देशात पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात कोरोनावरील पहिली लस देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

लस देताना तज्ज्ञांशी चर्चा करून पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी नागरिकांची निव़ड करण्यात आली असून, यात पोलिस, लष्कर आणि वैद्यकीय कर्मचाºयांचा समावेश आहे. लशींची सुरक्षितता आणि परिणामकारकतेला प्राधान्य असून याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भारतात दिली जाणारी लस ही जगातील इतर देशांनी तयार केलेल्या लशींइतकीच प्रभावी असेल, असेही आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. लस घेतल्यानंतर सौम्य ताप आणि लस दिलेल्या ठिकाणी वेदना असे त्रास होण्याची शक्यता आहे़ मात्र, हा प्रकार सर्वच लशींबाबत होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here