Home राजधानी मुंबई मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना चाचण्यांसंबंधी दिला ‘हा’ आदेश

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना चाचण्यांसंबंधी दिला ‘हा’ आदेश

69

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसºया प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ CM THAKARE ON KOVID-19 ] यांनी दिले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसºया विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. आॅक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्कफोर्सने अभ्यास करावा, असेही त्यांनी सूचित केले.

महानगरपालिका क्षेत्रात आजपासून रात्री ११ ते सकाळी ६ या वेळांत अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनावश्यक रहदारी टाळण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवासी देशांतर्गत प्रवास करत महाराष्ट्रात येतात. विविध राज्यातील अशा प्रवाशांकडे लक्ष द्यावे. यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, अशी सूचना केली.
मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीकरणाच्या तयारीचाही आढावा घेतला. यात लसीकरण करणारी यंत्रणा, पहिल्या टप्प्यात ज्यांना लस द्यावयाची आहे त्या आरोग्य कर्मचाºयांचा डेटा संकलित करून तो पाठवणे, शीतगृहांची व्यवस्था, प्रशिक्षण आदी गोष्टींचा समावेश होता. जिल्हा टास्क फोर्सने लसीकरणासंदर्भात बैठका घेण्याचे निर्देशही दिले.