Home प्रादेशिक विदर्भ कोरोना विषाणूसंबंधी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश

कोरोना विषाणूसंबंधी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश

88

अमरावती : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसºया प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. कोरोनाचा हा नवअवतार अत्यंत धोकादायक असून, मास्कच्या वापराची व इतर दक्षतेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. प्रशासनानेही याबाबत कठोर होत चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर [ yashomati thakoor ] यांनी आज दिले.

अख्ख्या जगात भय, मृत्यूचे तांडव करणाºया कोरोनाला नववर्षात अलविदा करून आपण सारेच एकदाचे भयमुक्त होऊ, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हायला लागली होती. त्यामुळे कोरोनाशी लढणाºया आरोग्य व पोलिस यंत्रणेने सुद्धा सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, परत आता नव्या अवतारात जगातील काही देशात कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा कोरोना विषाणू मूळ कोरोना विषाणूपेक्षाही ७० टक्के अधिक घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जीवघेणे संकट तूर्त परदेशात असले तरी वुहानप्रमाणे आपल्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे आता पूर्वीपेक्षाही अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. दुसºया विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. आरोग्य यंत्रणेने आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधी यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवणे आवश्यक आहे, असे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टनसिंग, अनावश्यक गर्दी टाळावी, आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.