Home रानशिवार नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आज रात्रीपासून रात्र संचारबंदी

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आज रात्रीपासून रात्र संचारबंदी

89

नागपूर : कोरोनाचे नवे संकट पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनावरून आज रात्री 11 वाजतापासून सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी [ night curfew ] घोषित करण्यात आली आहे. हा आदेश 22 डिसेंबर
2020 ते 5 जानेवारी 2021 पर्यंत लागू राहणार राहणार आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी सोमवारी बैठक आयोजित केली़ यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारी 2021 पर्यंत हा नियम लागू राहील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता फेरफटका मारण्यास, सायकल, दुचाकी किंवा चारचाकीने अनावश्यक बाहेर पडल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)