Home BREAKING NEWS ‘सावित्रीजोती’ मालिका मंत्री छगन भुजबळ यांची मोठी मागणी

‘सावित्रीजोती’ मालिका मंत्री छगन भुजबळ यांची मोठी मागणी

57

मुंबई : महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेली ‘सावित्रीजोती’ मालिका बंद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवन व समाजकार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत या मालिकेद्वारे पोहचविले जात आहे. मालिकेचे अद्याप १०० भाग प्रदर्शित होण्याचे बाकी आहेत.
महापुरुषांचा इतिहास हा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने या मालिकेसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक सुधारणेच्या कालखंडाबाबतचे भाग प्रदर्शित होणे बाकी आहे. या महापुरुषांच्या जीवनावरील माहितीपूर्ण भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या मालिकेसाठी राज्य शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी श्री.भुजबळ यांनी केली आहे.

दरम्यान, सदर मालिकेची निर्मिती ‘दशमी संस्था’ यांच्या वतीने केली असून मालिका सोनी मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. तसेच, ओमकार गोवर्धन आणि अश्विनी कासार यांची प्रमुख भूमिका आहे.
———

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here