Home राजधानी मुंबई राज्यातील धानखरेदी केंद्रांसंबंधी उपमुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

राज्यातील धानखरेदी केंद्रांसंबंधी उपमुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

100

धान खरेदी केंद्रांवर न आणता नोंदी करण्याच्या गैरप्रकारांवर कारवाई करावी. तसेच, खरेदी केलेले धान भरडाईसाठी मिलवर गेलेच पाहिजे. मिल बंद आणि कागदोपत्री तांदूळ तयार,अशा कागदोपत्री नोंदी खपणार नाहीत. सर्व खरेदी केंद्रे, जिल्हाधिकाºयांच्या अधिकार क्षेत्रातील गोदामे व मिलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्यांचे लाईव्ह परीक्षण केले जावे, असे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.

मुंबई : राज्य सरकारने सुरू केलेली धानखरेदी केंद्र्रे ही आपल्या राज्यातील शेतकºयांसाठी असून याठिकाणी परराज्यातील धान येता कामा नये. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणासारख्या परराज्यांच्या सीमांवरील नाक्यांवर कडक तपासणी मोहीम राबवावी. तसेच, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार [ deputy chief minister ajit pawar ]यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरचे विभागीय आयुक्त, पोलिस महानिरिक्षक, संबंधित चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची बैठक आयोजित केली. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पणनचे प्रधान सचिव अनुपकुमार उपस्थित होते. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.

राज्याच्या तिजोरीवर कोरोनामुळे ताण असतानाही शेतकºयांना आधार देण्यासाठी खरीप व रब्बी हंगामासाठी धानखरेदी योजना सुरू आहे. याअंतर्गत आधारभूत किंमतीसह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. महाराष्ट्रात धानाचा दर जास्त असल्याने परराराज्यातील शेतकरी आणि व्यापारी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या धान विक्रीसाठी आणतात. हे धान खरेदी केल्यास सरकारचे आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवैध धानवाहतूक करणारी वाहने जप्त करावी. धानाच्या नोंदी काटेकोर व्हाव्यात, परराज्यातील धान राज्यात येणार नाही यासाठी संबंधित विभागीय आयुक्त व पोलिस महानिरिक्षकांनी भरारी पथके नेमून आवश्यक कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
धानाचे ट्रक्स येत असतील तर त्यांची तपासणी व चौकशी झालीच पाहिजे. खराब, रंगहीन, ओले, कोंब फुटलेले, अपरिपक्व, भेसळयुक्त धानाची खरेदी झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाºयांना दिले.

काही सूचना अशा
– नागपूर महसूल विभागातील खासगी गोदामांवर करडी नजर ठेवावी
– जुना खराब तांदूळ, किडलेला तांदूळ शासनाच्या माथी मारू नये
– नवीन हंगामातला दर्जेदार तांदूळ हडप करण्याचे गैरप्रकार हाणून पाडावेत
– धान खरेदी केल्यावर ताबडतोब शेतकºयांच्या खात्यात रकमा आॅनलाईन जमा कराव्यात

नवीन स्वस्त धान्य दुकानांसंबंधी मंत्री भुजबळांची मोठी घोषणा

राज्यातील प्राचीन मंदिराचे जतन, संवर्धन होणार

अतिवृष्टीग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी