Home पूर्व विदर्भ केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त ब्रम्हपुरी तालुक्याची पाहणी

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त ब्रम्हपुरी तालुक्याची पाहणी

54

चंद्र्रपूर : केंद्रीय पथकाने आज ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पुरानंतर शासनाकडून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत 42 कोटींची मदत देण्यात आली. मात्र, तरीही पायाभूत सुविधांमधील अनेक मोठी कामे अपूर्ण असून यासाठी आणखी मदतीची गरज असल्याची मागणी नागरिकांनी पथकापुढे आज केली.

30, 31 आॅगस्ट आणि 1 सप्टेंबर या कालावधीत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोसेखुर्दचे 33 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ब्रम्हपुरी, मुल, सावली, गोंडपिंपरी, सिंदेवाही अशा पाच तालुक्यांमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यासाठी तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने आतापर्यंत 42 कोटी कोटींची मदत मंजूर केली. त्यापैकी 36 कोटी वितरित करण्यात आले आहेत. राज्य शासनाने या पुरामध्ये झालेल्या जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, पूरग्रस्त भागामधील पुनर्वसन, तात्पुरता निवारा, कृषी मालाचे नुकसान, पुरानंतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दुकानदारांना मदत अशा अनेक घटकांमध्ये आतापर्यंत 36 कोटीचे वाटप केले आहे. उर्वरित 6 कोटी रुपयांचे वितरण लवकरच करण्यात येत आहे.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची पणन महासंघाशी चर्चा

रस्ते व पुलाचे नुकसान
शेतकºयांना कृषिसंबंधी नुकसानीसाठी प्राथमिक मदत राज्य शासनामार्फत देण्यात आली आहे. मात्र, पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची पाहणी देखील आज करण्यात आली. याशिवाय या दौºयामध्ये पुरामुळे झालेल्या शेत नुकसानीबाबत विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील व मदत वाटपाबाबत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, यांच्याकडून माहिती घेतली. प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर पूरग्रस्तांना मदतीत काही उणीव राहू नये याची चौकशी देखील त्यांनी यावेळी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here