Home राष्ट्रीय दक्षिण चित्रपटक्षेत्रात दोन दिवसांत दोघांचा मृत्यू

दक्षिण चित्रपटक्षेत्रात दोन दिवसांत दोघांचा मृत्यू

75
अनिल नेदुमंगाड
अनिल नेदुमंगाड

तिरुवनंतपुरम : मल्याळम् अभिनेता अनिल नेदुमंगाड  ( Anil Nedumangad )  यांचा धरणात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, अनिल हे एका चित्रपटाच्या छायाचित्रणाच्या निमित्ताने आले होते. आज, शुक्रवारी ते मित्रांसोबत धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. ‘पापम चेय्याथावर कल्लेरियाट्टे’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे.

दरम्यान, गुरुवारी मल्याळम् दिग्दर्शक शानवास नारानिपुझा यांनी दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 37 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना कोइम्बतूरमधील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. यानंतर दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तब्येत खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला.