Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय या बातम्या वाचल्यात का…

या बातम्या वाचल्यात का…

49

नितीश कुमारांचे सहा आमदार भाजपमध्ये

पाटणा : बिहारमध्ये सत्तेत भागीदार असलेल्या भारतीय जनता पक्षानेच जनता दल युनायटेडचे (जदयू) अरुणाचल प्रदेशातील सहा आमदार आपल्याकडे वळवले आहे. त्यामुळे या राज्यात आता जदयूचा एकच आमदार शिल्लक आहे. भाजपाने आपल्या सहकारी पक्षाचे आमदार फोडल्याने अरुणाचल प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपाचा परिणाम बिहारच्या राजकारणावरही होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत नितीश कुमार मोठा निर्णय घेऊ शकतात, अशाही चर्चा रंगल्या आहेत. यावर बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

***

नगरविकास मंत्र्यांच्या वाहनाला अपघात

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.  मंत्री शिंदे गुरुवारी सायंकाळी मुंबईकडे येत असताना वाशी टोलनाक्यावर हा अपघात घडल्याची माहिती आहे. यात त्यांना केवळ बोटाला किरकोळ दुखापत झाल्याचे नवीन मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here