Home उपराजधानी नागपूर डॉ.पंजाबराव देशमुख यांना मंत्री डॉ. राऊत,  केदार यांचे अभिवादन

डॉ.पंजाबराव देशमुख यांना मंत्री डॉ. राऊत,  केदार यांचे अभिवादन

81

नागपूर : कृषी क्रांतीचे जनक, शिक्षण महर्षी तसेच देशाचे माजी कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांना जयंतीदिनानिमित्त महाराज बाग नागपूर येथे राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसेच पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी अभिवादन केले.

महाराजबाग येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला आज सकाळी नऊ वाजता डॉ.नितीन राऊत यांनी माल्यार्पण केले. तसेच राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय व क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी देखील माल्यार्पण करून अभिवादन केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचारी, विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.