‘ऊर्जाफु ले’ काव्यसंग्रहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

उपराजधानी नागपूर

नागपूर : राज्याच्या वीज निर्मिती कंपनीत भुसावळ येथे मुख्य अभियंतापदी असलेले विवेक पांडुरंग रोकडे यांच्या ‘ऊर्जाफु ले’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते पार पडले.

बेझनबाग येथील निवासस्थानी हा छोटेखानी प्रकाशन सोहळा पार पडला. पालकमंत्री डॉ.राऊत यांनी श्री. रोकडे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक केले. ऊर्जा विभागात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना सुद्धा त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेला पुस्तकाच्या माध्यमातून न्याय दिल्याची प्रशंसा त्यांनी केली.
निसर्ग व मानवी मनाच्या संवेदना व्यक्त करणाºया कवितांच्या संग्रहाला ‘ऊर्जाफु ले’ असे समर्पक नाव रोकडे यांनी दिले आहे. प्रत्येक कर्मचाºयाने आपल्यातील कलागुणांना जपावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच ऊर्जा विभागातील अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *