सत्संगाचे सुरक्षा कवच

रानशिवार

      संत राजिंदर सिंहजी महाराज

सत्संग आपणाला सद्गुरु द्वारे दिले गेलेले एक महान व बहुमूल्य बक्षीस आहे. सत्संगा मुळे आपला अध्यात्मिक विकास होतो. आणि आपली नेहमी सुरक्षा होते. जेंव्हा आपला जन्म झाला त्यावेळी आपण पूर्णपणे असहाय होतो. आपली एकमेव आई आपली मदत करीत होती. दूध पाजून आपलं पालन पोषण करीत होती. अशाप्रकारे आपण आपला विकास करण्यासाठी आपल्या आई-वडिलांवर विसंबून होतोआपली आई आपली पहिली रक्षक असते. आईचे प्रेम आपल्या मुलांसाठी उच्च स्थानी असते. तसेच आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आणि त्यांना प्रेम देण्यासाठी ती काहीही करू शकते

rajindar singhji

           सद्गुरूंचे प्रेम आईच्या प्रेमापेक्षा कैक पटीने अधिक असते. आई फक्त आपल्या मुलांना प्रेम देते. परंतु सद्गुरु आपल्या सर्व शिष्यावर प्रेम करीत असतात. आणि त्यांच्या आत्म्याला नवीन जन्म देतात. त्यांना मदत करतात आणि त्यांच्यावर दया दृष्टी करतात. शिष्याला नामाची दीक्षा देऊन त्याच्या अंतरी गुरु सूक्ष्म स्वरूपात विराजमान होतात. शिष्य कुठेही असला तरी सद्गुरु त्याच्या अंतरी सोबतच असतात. शिष्याला सत्यलोक म्हणजे सचखंड पर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याची सोबत सोडत नाहीत. आपल्या सत्संगी रुपी अभेद्य अशा अनमोल रक्षा-कवचाचे द्वारा आपले रक्षण करतात.

           जिज्ञासु द्वारा नेहमी एक प्रश्न विचारला जातो. साप्ताहिक सत्संगाला एकत्रित जाण्याचा उद्देश काय आहे? काही लोक असा विचार करतात की आपण महापुरुषांचा व्हिडिओ पाहू अथवा ऑडिओ कॅसेट ऐकू शकतो का? अथवा आपण अध्यात्मिक पुस्तके वाचू शकतो का? तसेच सतसंदेश आपल्या घरी बसून वाचू शकतो का? आपण प्रत्येक आठवड्याला घरातून निघून सत्संगाच्या ठिकाणी का जावे? हे प्रश्न योग्य वाटतात. आपण असा विचार करतो की सत्संग एक व्याख्यान आहे.  त्यात आपण कोणत्याही वक्त्याचे संदेश ऐकतो. वास्तविक सत्संग मौखिक व्याख्याना व्यतिरिक्त आणखी काही असतो. सत्संगा मध्ये अध्यात्मिक सूक्ष्म प्रेरणेचा सूक्ष्म प्रभाव असतो. जो आपल्या आत्म्याला अध्यात्मिक उभारी देतो. त्याच प्रमाणे बाह्य जगात गुंतणारे आपले मन जे आपल्या ध्येया पासून परावृत्त करते आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या लक्ष्याचा वेग मंद करते. सत्संगा मुळे एक अभेद्य सुरक्षा कवच प्राप्त होते, जेणे करून आपले लक्ष भौतिक संसारातून हटवून जीवनाच्या ध्येयपूर्ती करिता आपण लावू शकतो आणि ते ध्येय म्हणजे आत्मानुभव आणि प्रभू प्राप्ति. आपले जीवन इतके व्यस्त झालेले आहे की आपल्याला आध्यात्मिक विकास करण्यासाठी फारच थोडा वेळ मिळतो. तरी देखील आपल्याला सांगितलं जातं की आपण निदान कमीत कमी दिवसाचा दहावा भाग म्हणजे अडीच तास आपण घ्यान अभ्यासा करिता द्यावा. याबरोबरच आपल्याला सांगितले जाते की आपण निष्काम सेवा करण्यास वेळ दिला पाहिजे.

           रामायणात “लक्ष्मण-रेषा” आणि श्री गुरुग्रंथसाहेब यामध्ये “रामकार” सुरक्षा चे वर्णन आले आहे. संतांच्या छत्रछायेला “रामकारण” असे म्हणतात. सत्संगामध्ये आपल्यावर सद्गुरूंची छत्रछाया असते. संत आपल्या प्रगती मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यास आपली मदत करतात. सत्संगात जो भक्तिभावाने जातो तो अनासक्त होतो आणि संसाराच्या मोहमाये पासून मुक्त होतो. मोहमाये पासून मुक्त झालेला व्यक्तीचा आत्मा परमात्म्याशी एकरूप होऊन मुक्त होतो.

           सत्संगामध्ये उपस्थित व्यक्तीला सद्गुरूंच्या आध्यात्मिक शक्तीमुळे त्याच्या आत्म्याला अध्यात्मिक उभारी मिळते आणि तो अध्यात्मिक साधनेच्या मार्गात चांगली प्रगती करण्यास पात्र ठरतो. सत्संगात काही नवीन शोधणाऱ्या जिज्ञासूंना अध्यात्मात उभारी अवश्य मिळते. सत्संगात आल्यावर आपल्याला शांती स्थैर्य यांचा अनुभव प्राप्त होतो. सत्संगात आपल्याला स्फूर्ती प्राप्त होते ती आपल्याला आठवडाभर पुरते. त्यामुळे, संसारीक समस्यांपासून त्रास होत नाही. स्फूर्तीमुळे आठवडाभर आपण ध्यान-अभ्यास करतेवेळी चांगली एकाग्रता प्राप्त होते. आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्यात झालेले परिवर्तन व नियोजन अनुभवतात. जेंव्हा आपण त्यांच्याशी शांत व प्रेमपूर्वक व्यवहार करतो. त्याचा सुद्धा अनुभव ते घेतात. सत्संगात गेल्यावर त्याचा प्रभाव पडतो.

           सत्संगात आपणास एक सदाचारी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. येथे आल्यावर आपण शाखाहारी भोजनाच्या नैतिक मूल्यांवर ठाम राहतो. सत्संगाच्या ठिकाणी केलेल्या निष्काम सेवेमुळे आपण अंतर-बाह्य शुद्ध आणि स्वच्छ होतो. सत्संगात आपल्या आत्मिक विकासाकरिता सद्गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांच्या अध्यात्मिक शक्तीपाताचा प्रभाव (चार्जिंग) प्राप्त होतो. तो आपणास प्रेम आणि अध्यात्मिक विकासात उपयुक्त ठरतो.

           सत्संग आपल्याकरिता एका चौकीदारीचे काम करतो. चौकीदार जसा रात्री जागते रहो असा आवाज देत असतो. त्याचप्रमाणे सत्संग आपल्याला जागृत करीत असतो. कोणती गोष्ट आपल्या आत्म्या करिता सहाय्यक असते. याकरिता सत्संग आपल्याला जागृत करीत असतो. सत्संग आपले ध्यान जीवनाच्या अध्यात्मिक बाबींकडे करण्यास मदतगार होतो. सत्संग आपल्या आठवड्याचे सातही दिवस ध्यान-अभ्यासाची प्रेरणा देतो. आपण जेंव्हा एखादे रोप लावतो तेंव्हा त्या रोपाला हवा, प्राणी किंवा सभोवतालच्या नष्ट करणाऱ्या इतर शक्तींपासून वाचवतो. त्या रोपाच्या सुरक्षेसाठी त्याला छोटी गोल जाळी चे सुरक्षा कवच लावतो. सत्संग देखील अशाच प्रकारचे एक सुरक्षा कवच आहे. त्यामुळे आपला आत्मिक विकास पुष्ट होतो. जेंव्हा आपण नवनवीन अध्यात्मिक साधनेत प्रगती करतो तेंव्हा संसारातील अनेक आकर्षणे आपल्यावर हल्ला करतात. आपल्याला ध्येयापासून दूर घेऊन जाण्यास सफल होतात. सत्संग आपल्यासाठी एक सुरक्षा कवचाचे काम करतो. जेणेकरून आपण ध्यान-अभ्यास आरामात सहजपणे करू शकतो.

           सत्संग आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक लाभ देतो. सत्संगात आपणास प्रेरणा मिळते. त्याद्वारे आपण अध्यात्मिक मार्गावर जलद गतीने प्रगती करू प्रगती करू शकतो. तसेच थोड्याच कालावधीत आपल्या आत्म्याचे परम्यात्म्यात विलीन होण्याचे आपले ध्येय प्राप्त करू शकतो. हे केवळ सत्संगाच्या या देणगीमुळे शक्य आहे. आपण आपल्या सद्गुरूंचा कृतज्ञता पूर्वक सन्मान केला पाहिजे. कारण, सर्व संत आपल्याला सदैव दिवस-रात्र कायमची सुरक्षा देतात आणि आपणावर अपार कृपा करतात.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *