हिंगणा एमआयडीसीत भीषण आग

उपराजधानी नागपूर

नागपूर : हिंगणा एमआयडीसीतील स्पेस वूड कंपनीला आज सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.
स्पेस वूड कंपनीत फर्निचर तयार करण्यात येत असून मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागली. आग वेगाने पसरल्याने मोठी आर्थिक हानी झाल्याचे सांगण्यात येते़ याशिवाय आजूबाजूच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, फायर ब्रिगेडची वाहने आणि टँकर घटनास्थळी पोहोचले असून, अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *