Home राजधानी मुंबई वेबिनार : आर्थिक दहशतवाद संपवण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे

वेबिनार : आर्थिक दहशतवाद संपवण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे

91

मुंबई : पैशांचा अवैध व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद विषयावर जागतिक दहशतवादविरोधी परिषदेने वेबिनारचे आयोजन केले. दोन दिवसीय वेबिनारमध्ये शेवटच्या दिवशी सायबर क्षेत्रातील साधनांद्वारे जागतिकस्तरावर होणारे मनी लाँडरिंग आणि आर्थिक दहशतवाद, त्याची कारणे, उपाय यावर चर्चा करण्यात आली. या समस्येचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले.

श्रीलंकेचे विदेश सचिव प्रोफेसर जयनाथ कोलुंबग म्हणाले, की दहशतवाद ही केवळ एका देशाची समस्या नसल्याने संपूर्ण जगाने एकत्रितरित्या काम करणे महत्त्वाचे आहे. दहशतवादी संघटना मजबूत होण्यासाठी आर्थिक कुमक लागते ती देशांतर्गत व्यवहारातूनच उपलब्ध होत असल्याचे आढळून आले आहे. कायद्यात पळवाटा शोधून गुन्हेगार निर्दोष सुटण्याची शक्यता असते. अंमली पदार्थांची आणि मानवी तस्करी यातूनही पैसा जमा करण्यात येतो. दहशतवादी  [ cyber terrorism ] संघटना सरकारी यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी कार्यरत असतात. पैसा हे त्यांचे मूळ शस्त्र असल्याने ते अवैधरित्या देशात वापरात येऊ नये यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. आर्थिक दशतवाद आणि मनी लाँडरिंग कोणत्याही एका देशाची समस्या नाही, यावर त्यांनी भर दिला.

यावर चर्चा
– मनी लाँडरिंग
– अर्थव्यवस्था
– जागतिक सुरक्षा
– सामाजिक दुष्परिणाम
– नक्षलवाद
– अवैध शस्त्रे
– वाढती गुन्हेगारी
– कायद्यातील पळवाटा
– काळा पैसा कायदेशीररित्या येणे
– नेट बँकिंग

दहशतवादविरोधात लढण्यासाठी जागतिकस्तरावर कायद्याची चौकट आणि नियामक यंत्रणा यात सुसूत्रता असायला हवी. एका देशातील दहशवादाविरोधात लढताना दुसºया देशाचे सहकार्य करणे कायद्याने सोपे व्हावे. भारत, श्रीलंका, फिलीपाईन्स, आफ्रिका, अमेरिका अशा अनेक देशात दहशतवादी घटना घडल्या असून, नक्षली संघटना कार्यरत असल्याचे मत अनेकांनी मांडले.

आफ्रिकन इंटेलिजन्स सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जसीम हाजी, इंटरपोलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मदन मोहन ओबेरॉय, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील सायबर कायद्याचे तज्ज्ञ डॉ. पवन दुग्गल, फॉरेन ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशनचे माजी अधिकारी डॉ. स्टीफन कटलर, सायबर सुरक्षा तज्ञ जितेन जैन, फिलिपाईन्सच्या इंटेलिजन्स आणि सुरक्षा अभ्यास सोसायटीचे अध्यक्ष प्रोफेसर रोमेल बॅनलॉय आदींनी सायबर जगतातील साधनांद्वारे होणारे मनी लाँडरिंग आणि त्यांचा सामना करण्यासाठी उपायांबाबत मते मांडली. सूत्रसंचालन संचालक प्रदीप गोडबोले यांनी केले.

 

ग्रामपंचायत निवडणूक : जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज बुधवारीही स्वीकारण्याचे निर्देश

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी आगामी १० फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित