Home उपराजधानी नागपूर तरुणाची हत्या, दोन तासांत चारही आरोपी ताब्यात

तरुणाची हत्या, दोन तासांत चारही आरोपी ताब्यात

79

नागपूर : पैशांच्या वादातून वाठोडा पोलिस ठाण्याअंतर्गत एका बौद्धविहाराजवळ मंगळवारी दुपारी तरुणाची हत्या करण्यात आली़ आकिब अब्दुल सत्तार शेख (वय 22) असे मृतकाचे नाव आहे. दरम्यान, वाठोडा पोलिसांनी दोन तासांत चारही आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिस सूत्रांनुसार, आरोपी प्रकाश भीम कोसरे, अजय यशवंत बोकडे, विशाल पृथ्वीलाल गुप्ता आणि अन्य एक अल्पवयीन यांचा मृतक आकिबसोबत पैशांवरून वाद होता. या चौघांनीही श्रावणनगर येथील बौद्धविहाराजवळ आकिबची मान आणि गळ्यावर धारदार शस्त्राचे अनेक वार केले़ यात त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन वगळता तिघांची वय 19 ते 21 वर्षांदरम्यान आहे.
अप्पर पोलिस आयुक्त नविनचंद्रा रेड्डी, पोलिस उप आयुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे, सपोनि निलेश गोसावी, पोउनि रमेश नन्नावरे, सहाफ़ौजदार बट्टूलाल पांडे, पोहवा राधेशाम खापेकर, नापोशि जगन्नाथ, पोशि मंगेश टेंभरे, अतुल टिकले, पवन साखरकर, देव सोनकुसरे यांनी दोन तासांच्या आत आरोपींना गजाआड केले.