Home नागपूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारताना पकडले

भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारताना पकडले

45
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

गोंदिया : गोरेगांव येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक राजकपूर कचरू मेश्राम (51 वर्षे) यांना तीन हजार रुपयांची लाच सीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
माहितीनुसार, यातील तक्रारदार गोवारीटोला (पो. तेढा, ता. गोरेगाव जि. गोंदिया) येथील रहिवासी असून ते जि.प. प्राथमिक शाळा येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे. त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या 1.09 हे. आर. जमिनीची मोजणी करण्यासाठी तक्रारदाराने 22 सप्टेेंबर 2020 रोजी गोरेगांव अभिलेख कार्यालय येथे अर्ज करून त्याबाबतचे
शासकीय शुल्क दोन हजार रुपये चालानद्वारे जमा केले होते. त्यावरून राजकपूर कचरू मेश्राम यांनी ठरल्यानुसार 7 डिसेंबर 2020 रोजी तक्रारदाराच्या मुलाच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी करून दिली. त्यावेळी त्यांनी खर्च-पाण्याचे म्हणून पाच हजारांच्या लाच रकमेची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने मोजणीचे शासकीय शुल्क भरल्याचे सांगून रक्कम कमी करण्याची विनंती क ेली असता त्यांनी एक हजार कमी करून मला चार हजार रुपये द्या,अन्यथा तुम्हाला ‘क’ प्रत देणार नाही असे म्हटले. त्यानंतर तक्रारदार प्रत घेण्यासाठी गेले असता मेश्राम यांनी तक्रारदारास लाचेची पुन्हा मागणी केली. यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथील अधिकाºयांना भेटून तक्रार नोंदविली़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (गोंदिया) पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे यांनी तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून मेश्राम यांच्या विरोधात सापळा रचून कारवाईचे आयोजन केले. यात पडताळणीअंती आज 29 डिसेंबर रोजी राजकपूर कचरू मेश्राम यांनी तक्रारदाराचे मुलाला ‘क’ प्रत देण्यासाठी तीन हजारांची मागणी करून लाच रक्कम स्वीकारल्याने गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर) यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, स. फौ. शिवशंकर तुंबळे, ना.पो.शि. रंजीत बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले,राजेंद्र बिसेन व चालक नापोशि देवानंद मारबते (सर्व लाप्रवि गोंदिया) यांनी केली़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here