Home राजधानी मुंबई महाराष्ट्र सुरक्षा बलातील लता बन्सोले यांचा मंत्रालयात सत्कार

महाराष्ट्र सुरक्षा बलातील लता बन्सोले यांचा मंत्रालयात सत्कार

69

मुंबई : महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कार्यरत लता बन्सोले यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकल रेल्वेगाडीसमोर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील [  minister gulabrao patil ] यांनी लता यांना मंत्रालयात आमंत्रित करत त्यांचा विशेष सत्कार केला.

मंत्री श्री. पाटील यांनी लता बन्सोले यांच्या धाडसाचे कौतुक केले. महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून त्या धाडसातही मागे नाहीत हे श्रीमती बन्सोले यांनी पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्या जळगाव जिल्ह्यातील असल्याने आपल्याला विशेष आनंद झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक भीमराव कोरे व सुरक्षा पर्यवेक्षक प्रांजली जाधव उपस्थित होते.

मूळच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील लता विनोद बन्सोले [  lata bansole ] सध्या मुंबई येथे सुरक्षा दलात कार्यरत आहेत. मागील शनिवारी, 26 डिसेंबरला सकाळी ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर असताना त्यांच्यासमोरील एक प्रवासी अचानक चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडला. यातच समोरून वेगाने लोकल येत होती. यावेळी लता यांनी प्राणाची पर्वा न करता रूळांवर (रेल्वे ट्रॅक) उडी घेत त्या व्यक्तीला बाजूला काढून समोरून येणाºया लोकलच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. यामुळे गाडी थांबवल्याने प्रवाशाचे प्राण वाचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here