संसदेच्या पेट्रोलियम समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

राजधानी मुंबई

मुंबई : संसदेच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू या विषयावरील स्थायी समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष रमेश बिधुरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. रमेश बिधुरी यांनी यावेळी राज्यपालांना समितीच्या कार्याची माहिती दिली.

समितीचे सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, खासदार राजन विचारे, आंध्र प्रदेश येथील खासदार श्रीमती चिंता अनुराधा, खासदार डॉ रमेश चंद बिंड (उ. प्र.) व गिरीश चंद्र (उ. प्र.), डॉ़ भारतीबेन धिरुभाई शियाल (गुजरात), अजय टामटा (उत्तराखंड), श्रीमती कांता कर्दम (राज्यसभा), कनकमेडला रविंद्रकुमार (राज्यसभा) आणि ए. विजयकुमार (राज्यसभा) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *