राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडून नववर्षानिमित्त शुभेच्छा

राजधानी मुंबई

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २०२१ या नववर्षानिमित्त [ new year 2021 ] सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना संसगार्मुळे २०२० हे संपूर्ण वर्ष जगाकरिता अत्यंत आव्हानात्मक होते; परंतु शाश्वत मानवीमूल्ये, कोरोना योद्ध्यांचे कार्य, सेवाभाव तसेच परस्पर स्नेहभावना यामुळे भारतवासियांनी कोरोनाच्या आव्हानाला धैर्याने तोंड दिले. कोरोनाविरुद्ध सावधगिरी बाळगतानाच आगामी वर्षांत आपण देशासाठी, राज्यासाठी तसेच समाजासाठी अधिक निष्ठेने व समर्पण भावनेने कार्य करण्याचा संकल्प करूया.
२०२१ हे वर्ष सर्वांना सुख, समाधान व उत्तम आरोग्य प्रदान करो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा, असे राज्यपालांनी [ governer koshyari ] आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.

काळजी घेण्याचा संकल्प करूया : मुख्यमंत्री
कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प आपण नव्या वर्षासाठी करूया, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
मागील वर्षभर संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील अतिशय जबाबदारीने ही लढाई लढली आहे. आज आपण विविध मार्गाने कोरोना संसर्ग काहीसा कमी करीत आणला असला तरी नव्या वर्षातही बेसावध न राहता आपल्यासह कुटुंबाचीही आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे [ chief minister udhhav thakare ] आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२० साठी प्रवेशिका आमंत्रित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *