सामाजिक न्यायमंत्र्यांकडून नागपुरात स्नेहा घोडेस्वारला मोलाची मदत

राजधानी मुंबई

नागपूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विदेशी शिष्यवृत्तीसंदर्भात विशेष आदेश निर्गमित केल्याने नागपुरातील स्नेहा घोडेस्वार या विद्यार्थिनीसह ेतेजस्वी शिंदे या दोघांन शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

स्नेहा काशीनाथ घोडेस्वार [ sneha ghodeswar] हिला आॅस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठात मास्टर आॅफ इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता़ तसेच, ती विदेशी शिष्यवृत्तीस पात्र ठरली होती़ मात्र सदर विद्यापीठाने ऐनवेळी तिच्या जागी दुसºया विद्यार्थ्यास प्रवेश दिल्याने स्नेहासमोर समस्या उभी राहिली. शिष्यवृत्ती योजनेच्या नियमांचा विचार करत आॅस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठात मास्टर आॅफ इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवत तिने शिष्यवृत्ती लागू व्हावी याबाबत विनंती केली होती. त्यानुसार मंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याचा विचार करत तातडीने विशेष बाब म्हणून निर्णय घेत बदललेल्या विद्यापीठातील बदललेल्या अभ्यासक्रमासाठी विदेश शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतल्याने स्नेहाची समस्या सुटली. आपल्या मास्टर्स आॅफ इंजिनिअरिंगच्या प्रवेशासह विदेशी शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याबद्दल मंत्री मुंडे [ dhananjay munde ]  यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत, अशा भावना स्नेहा घोडेस्वार हिने व्यक्त केल्या आहेत.

तेजस्वी लक्ष्मण शिंदे [ tejasvi shinde ]  ही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील अंगापूर येथील प्रतिभावंत विद्यार्थिनी अंतराळ विज्ञान शाखेत आॅस्ट्रेलिया येथील विद्यापीठात पीएच. डी. चे शिक्षण घेत असून, जगभरातील निवडक १५० विद्यार्थ्यांपैकी हा बहुमान मिळालेली ती एक विद्यार्थिनी आहे. आॅस्ट्रेलियन विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे तिला देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम परदेश शिष्यवृत्तीच्या मिळणाºया रकमेतून वजा करण्याचा मूळ नियम आहे; परंतु तेजस्वीने आर्थिक परिस्थिती पाहता विदेश शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम मिळावी, जेणेकरून तिच्या परदेशातील शिक्षण व उदरनिवार्हास अडचण येणार नाही, अशी विनंती सामाजिक न्याय विभागाकडे केली होती, ही बाब मंत्र्यांना समजताच शिष्यवृत्ती योजनेतील देय असलेला पूर्ण लाभ देण्याचे आदेशच मंत्री मुंडे यांनी निर्गमित केल्याने तेजस्वीचीही समस्या आपोआप सुटली.

मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे मंत्री मुंडे यांचे मी मन:पूर्वक आभार मानते. त्यांच्यामुळे स्पेस सायन्स पीएच. डी.ची वाट मोकळी होऊ शकली, अशा शब्दात तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *