Home उपराजधानी नागपूर नागपुरात उद्या कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

नागपुरात उद्या कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

59
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर : उद्या शनिवारी नागपुरातील तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाचा [ corona dose ]  ‘ड्राय रन’ होणार असून यासह महाराष्ट्रातील पुणे, जालना, नंदुरबार जिल्ह्याचाही समावेश आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठीच्या तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘ड्राय रन’साठी एकाच जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र निवडण्यात आले आहेत. या तीनही ठिकाणी प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही़ मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील.

महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामठी, नागपूर महानगरपालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र्र, जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र्र आणि जिल्हा रुग्णालय नंदुरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here