Home उपराजधानी नागपूर ऋषिकेश पोहनकर यांना ‘नृत्य कौमुदी पुरस्कार २०२०’ प्रदान

ऋषिकेश पोहनकर यांना ‘नृत्य कौमुदी पुरस्कार २०२०’ प्रदान

101

नागपूर : नागपुरातील युवा नर्तक ऋषिकेश पोहनकर यांना ‘अभिनय नृत्य भारत’ द्वारा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री अल्ल कली कृष्ण श्रीनिवास [ ALLA KALI KRISHNA SRINIVAS ] यांच्या हस्ते ‘नृत्य कौमुदी पुरस्कार २०२०’ प्रदान करण्यात आला.

वायएमएचए हॉल इलुरू (आंध्र प्रदेश) येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रख्यात कुचिपुडी नृत्यातील तज्ज्ञ डॉ. अर्धनारीश्वरम् व्यंकट, श्री. हेमासुंदर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वशक्तिमान भगवान नटराज आणि गुरू श्रीमती रत्नम् जे. नायर, हितचिंतक, मित्रपरिवार, कुटुंबीय यांच्या आशीवार्दाने हा सन्मान प्राप्त झाला, अशा भावना ऋषिकेश पोहनकर यांनी व्यक्त केल्या.