Home उपराजधानी नागपूर सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल : उपमुख्यमंत्री पवार

सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल : उपमुख्यमंत्री पवार

67

मुंबई / नागपूर : महाराष्ट्राच्या विधानमंडळाची उच्च परंपरा असून त्याला एक नैतिक अधिष्ठान आहे. नागपुरातील नवीन कक्षाच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल. कक्ष शासन आणि विदर्भातील जनता यामधील दुवा म्हणून काम करेल, असा आशावाद उपमुख्यमंत्री अजित पवार [ ajit pawar] यांनी व्यक्त केला.

उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी देखील दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित केले. आजचा सोहळा हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी केलेल्या ऐतिहासिक भावनिक ऐक्याच्या वक्तव्याची आठवण करून देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे एक केंद्र पुणे येथे उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

 

पालकमंत्री डॉ.राऊत म्हणाले, की नागपूरसारख्या परिवर्तनाच्या भूमीमध्ये ही नवी ऐतिहासिक घटना आहे. मुंबईचे हेलपाटे टाळण्यासाठी येथील जनतेला उपलब्ध झालेली लोकशाहीतील ही मोठी संधी असून विदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांवर गंभीर चिंतन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नागपूरमध्ये ब्युरो आॅफ पार्लमेंटरी स्टडी अँड ट्रेनिंगचे केंद्र उभारण्यात यावे. संसदेप्रमाणे संसदीय कामकाजाबद्दलची अद्ययावत माहिती अपलोड असणारी विधिमंडळाचे संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करण्यात यावी. तसेच, राज्यस्तरीय विभागाची मुख्यालये सुरू करण्यात यावी, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

संसदीय कामकाज मंत्री अ‍ॅड. परब यांनी विदर्भातील लोकप्रतिनिधींना संसदीय लोकशाहीमध्ये लढण्यासाठी या कक्षाच्या माध्यमातून प्रभावी आयुध मिळाले असल्याचे सांगितले. कोरोना महामारीच्या काळात हिवाळी अधिवेशन घेता आले नाही. मात्र, याठिकाणी सुरू केलेल्या या कक्षाच्यामार्फत अशा अपवादात्मक परिस्थितीत प्रादेशिक सहभागासह अधिवेशन घेतले जाऊ शकते, या शक्यतेला बळकटी मिळाली आहे, असे श्री.परब यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नव्या उपक्रमाला शुभेच्छा देताना या माध्यमातून विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. केदार यांनी नागपूर करारानंतरची ही सर्वात मोठी घटना असल्याचे सांगून या कक्षाच्या माध्यमातून माजी आमदारांना देखील न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायकासाठी प्रशिक्षण आयोजित करावेत. या केंद्राच्या निर्मितीनंतर अनेक विधिमंडळ समितीच्या बैठका नागपुरात होणार आहेत. या बरोबरच महिन्यातून एकदा तरी विधानसभा अध्यक्ष विधानपरिषद सभापती व अन्य पदाधिकाºयांनी याठिकाणी आढावा बैठक घ्यावीत, अशी सूचना श्री. झिरवाळ यांनी केली. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सोहळ्याला आमदार ना. गो. गाणार, अभिजीत वंजारी, विकास ठाकरे, कृष्णा खोपडे, अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांचेसह महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य तसेच माजी आमदार जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, यादवराव देवगडे, गेव्ह आवारी, दीनानाथ पडोळे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगर आयुक्त शितल उगले-तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, विधानमंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here