Home प्रादेशिक विदर्भ सूर्योदय महिला गृह उद्योगास पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली भेट

सूर्योदय महिला गृह उद्योगास पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली भेट

89

अकोला : तेल्हारा शहरातील सूर्योदय महिला गृह उद्योग येथे आज पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू [ MINISTER BACHHU KADU ] यांनी भेट देऊन पाहणी केली.

उद्योगाच्या मुख्य प्रवर्तक दिपीका देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री.कडू यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तेरानिया उपस्थित होते. या उद्योगातील सहभागी महिला भागीदारांनी मिळून सर्व उत्पादनांची माहिती दिली. उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. निमशहरी भागातील महिलांनी अशा प्रकारे स्वयंप्रेरणेने उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे हे एक उत्तम उदाहरण आहे, असेही श्री.कडू यांनी सांगितले. या महिलांनी बनविलेली विविध उत्पादने ही पर्यावरण पूरक व सेंद्रिय असून त्यांना अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना काळात ना नफा ना तोटा या तत्वावर एक लाखाहून अधिक मास्क निर्मिती करून पुरवठा करणाऱ्या महिलांचा श्री.कडू यांनी सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र तेल्हाराचे व्यवस्थापक जमीर शेख उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या तेल्हारा शाखेतर्फे या उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील इतर मागासवर्ग महामंडळाच्या अर्थसहाय्य योजनेतून दहा लाख रुपयांचे कर्ज मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले.