Home राष्ट्रीय मुलींनो, वर्गात बसा आणि रोज 100 रुपये मिळवा

मुलींनो, वर्गात बसा आणि रोज 100 रुपये मिळवा

130

 AASAM GIRL EDUCATION : आसाम सरकारने मुलींच्या शिक्षणासंंबंधी  एक मोठा निर्णय घेतला असून शाळेतील वर्गात बसल्याबद्दल मुलींना दररोज 100 रुपये देण्याची योजना सुरू केली आहे़ राज्याचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी याबाबत माहिती दिली. जानेवारी 2021 च्या शेवटापर्यंत प्रत्यक्ष दररोज 100 रुपये द्यायला सुरुवात होईल, असेही मुख्यत्वे सांगितले.

तसेच, आसाम सरकारच्या प्रज्ञान भारती योजनेअंतर्गत 12 वीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करणाºया विद्यार्थिनींना [ AASAM SCHOOL GIRL ] 22 हजार दुचाकी वाहने देण्यात येणार असून या योजनेसाठी 144.30 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. अशा विद्यार्थिनींची संख्या एक लाखाहून अधिक असली तरीही दुचाकी दिल्या जातील, असे सरमा यांनी नमुद केले. विशेष म्हणजे 2018-19 मधील परीक्षातीलही प्रथम श्रेणी विद्यार्थिनींना सरकार दुचाकी देणार आहे.

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींच्या बँक खात्यांत जानेवारीअखेर अनुक्रमे 1,500 रुपये व 2,000 रुपये जमा केले जातील. शैक्षणिक पुस्तके आणि अभ्यासाच्या इतर साहित्यासाठी ही रक्कम वापरता येतील, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.