Home राष्ट्रीय पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा या कारणाने भारत दौरा रद्द

पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा या कारणाने भारत दौरा रद्द

83

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (British Prime Minister Boris Johnsons ) यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे़ ते 26 जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.

पंतप्रधान बोरीस यांनी कोरोनाचे वाढते संकट आणि नव्या कोरोनाची भर यामुळे हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदी यांना दूरध्वनीवरून याबाबत माहिती देत प्रजासत्ताक दिनी येता येणार नसल्याबाबत खंत व्यक्त केली. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here