Home नागपूर भाजपचे दयाशंकर तिवारी यांची नागपूरचे नवे महापौर

भाजपचे दयाशंकर तिवारी यांची नागपूरचे नवे महापौर

83

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे दयाशंकर तिवारी [ nagpur mayor dayanand tiwari ] यांची नवे महापौर म्हणून निवड झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
आज मंगळवारी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होऊन दयाशंकर तिवारी अधिक मतांनी महापौरपदी निवडून आले. निवडणुकीत तिवारी यांनी काँग्रेसच्या रमेश पुणेकर यांचा पराभव केला. दयाशंकर तिवारी यांना १०७, तर महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश पुणेकर यांना केवळ २७ आणि बहुजन समाज पक्षाच्या नरेंद्र्र वालदे यांना १० मते मिळाली. यात पाच नगरसेवक अनुपस्थित राहिले.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मनीषा धावडे यांनीही १०७ मते प्राप्त केली. तर काँग्रेसच्या उमेदवार रश्मी धुर्वे यांना २६, बसपाच्या उमेदवार वैशाली नारनवरे यांना १० मते मिळाली. या निवडणुकीमध्ये किशोर कुमेरिया, आभा पांडे, ‌ऋषिकेश (बंटी) शेळके, गार्गी चोपरा, पुरूषोत्तम हजारे, कमलेश चौधरी हे ६ सदस्य गैरहजर होते.
पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्वाधिक १०७ मते प्राप्त झालेले दयाशंकर तिवारी यांची महापौर पदाचे व मनीषा धावडे यांची उपमहापौर पदाच्या विजयी उमेदवार म्हणून घोषणा केली.

दरम्यान, महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून अर्ज सादर केलेल्या दोन उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी प्रभाग ३३ ड चे नगरसेवक मनोजकुमार धोंडूजी गावंडे यांनी नामनिर्देशन सादर केले होते. तर उपमहापौर पदाकरिता प्रभाग २८ ब च्या नगरसेविका मंगला प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले होते. निवडणुकीच्या वेळी दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here