2021 मध्ये आपण आंतरिक सूर्यकिरणांचा आनंद घेऊया !

रानशिवार

सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष संत राजिन्दर सिंहजी महाराज यांनी नववर्ष 2021 च्या प्रसंगी शिकागो, अमेरिका येथून मानव एकता, शांती आणि ध्यान-अभ्यासाचा मानवजातीला युट्युब वरील प्रसारणाद्वारे केलेला संदेश…

rajindar singhji

संत राजिन्दर सिंहजी महाराज यांनी संकट समयी नवीन वर्षात पदार्पण करणाऱ्या संपूर्ण विश्वाला शांती व सुख मिळवण्याचा मार्ग सांगताना नववर्ष 2021 ची घोषणा दिली की, Bask in the inner sun in 2021 अर्थात 2021 मध्ये आपण आंतरिक सूर्यकिरणांचा आनंद घेऊया. हे नवीन वर्ष आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जावो, अशी संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी शुभेच्छा दिली.

या प्रसंगी संत राजिन्दर सिंहजीद्वारा लिखित Inner-Outer peace through Meditation च्या पहिल्या ध्वनिमुद्रित पुस्तकाचे विमोचन केले, जिची ध्यान-अभ्यास या विषयावर सर्वात जास्त विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये गणना झालेली आहे. हे ध्वनिमुद्रित पुस्तक Amazon, Audible  आणि  iTunes वर उपलब्ध आहे. ऑनलाईन कार्यक्रमाच्या आरंभी आदरणीय माता रिटाजी यांनी गुरुवाणीतील शिखांचे पाचवे गुरू – गुरू अर्जन देव जी महाराज यांच्या वाणीतील एक भक्तिरचना- तुम दया करो मेरे साईचे गायन केले.

त्यानंतर संत राजिन्दर सिंहजी यांनी ऑनलाइन सत्संगातून समजाविले की, ह्लगत वर्ष 2020 आपणा सर्वांकरिता दुःख आणि क्लेशदायक होते कारण त्या कालावधीत रोगाच्या संसर्गाचा प्रभाव होता. मी त्या लोकांप्रती हार्दिक कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी या कठीण समयी मानवतेची निष्काम भावनेने सेवा केली. आपण आपापल्या घरात राहिलो, जेणेकरून संसर्ग पसरू नये. असे केल्याने आपण असंख्य लोकांच्या जीवनाची रक्षा केली. आपणास सर्वांकरता हा कालावधी फारच अडचणीचा होता. तरी सुद्धा परमपिता परमेश्वराची कृपादृष्टी आणि प्रेम आपल्या सर्वांवर टिकून राहिले.ह्व

त्यांनी सांगितले की, बाहेर कितीही अंधार असला तरी त्याचा काहीही फरक न पडता, आपण ध्यान-अभ्यासाद्वारे आपल्या अंतरातील प्रभूच्या दिव्यज्योतीशी जोडले जाऊ शकतो, जी आपणास सदैव सुख आणि शांती प्रधान करते. म्हणूनच मी या वर्षा करीता हे घोषवाक्य निवडले आहे, 2021 मध्ये आपण आपल्या अंतरातील सूर्यकिरणांचा आनंद घ्यावा!

संत राजिन्दर सिंहजी महाराज यांनी समजावताना म्हटले की, ह्लचला तर, आपल्यातील प्रभूची दिव्यज्योती प्रज्वलित झालेली आहे, हे आपण जाणून घेऊया.. जिच्या बरोबर कोणीही कोणत्याही वेळी ध्यान-अभ्यासाद्वारे जोडले जाऊ शकतो. जेव्हा जीवनामध्ये आपण दुःख आणि क्लेष यांनी घेरले जातो, त्यावेळी ध्यान-अभ्यासाद्वारे आपल्या अंतरातील ज्योतीशी जोडल्या गेल्यामुळे भरपूर सुख आणि शांती प्राप्त होते. मी अशी प्रार्थना करतो की आपणास नववर्ष 2021 मध्ये आपले सर्वांचे जीवन प्रभूच्या दिव्य ज्योतीने, अध्यात्मिक प्रेम, शांती आणि शाश्वत सुखाने परिपूर्ण होवो. परमेश्वराची कृपा दृष्टी आपणा सर्वांवर सदैव राहो, जेणेकरून आपण आंतरिक सूर्य किरणांचा आनंद घेऊ शकू.

संत राजिन्दर सिंहजी महाराजांना ध्यान-अभ्यासाद्वारे आंतरिक आणि बाह्य शांती प्रस्थापित करण्यासाठी पूर्ण विश्वात जाणले जातात. संत राजिंदर सिंह जी महाराज आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त लेखक आहेत. मागील तीस वर्षापासून संपूर्ण विश्वभरात शांती, एकतेचा, प्रेमाच्या संदेशा चा प्रसार करीत आहेत.

संत राजिन्दर सिंहजी महाराज एक वैज्ञानिक आहेत. त्यांची शिकवणूक विज्ञान आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू यावर आधारित आहे आणि त्यांच्या शिकवणुकीतून आज संपूर्ण विश्व अध्यात्मिक लाभ प्राप्त करीत आहेत. संत राजिंदर सिंह जी महाराजांचे जीवन आणि त्यांच्या महान कार्याचे निष्कर्ष जर काढला तर अखंड प्रेमाचा वाहता प्रवाह आहे, जो निष्काम सेवेवर आधारित आहे आणि परमेश्वर प्राप्तीस सहाय्यक आहे.

संत राजिन्दर सिंहजी महाराज अध्यात्मावरील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांचे सुप्रसिद्ध लेखक आहेत, ज्यांना वेगवेगळ्या देशांनी पाच डॉक्टरेट च्या पदव्या देऊन सन्मानित केले आहे. सावन कृपाल रुहानी मिशन ची संपूर्ण विश्वात 3000 हुन अधिक केंद्रे स्थापित झालेली आहेत. तसेच या संस्थेचे साहित्य पंचावन्नहुन अधिक भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. याचे मुख्यालय विजयनगर, दिल्ली येथे असून आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपर्विल्ले अमेरिकेत स्थित आहे.

 

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *