Home उपराजधानी नागपूर ग्रामपंचायत निवडणुकीत दावे-प्रतिदावे, हिरवेबाजारात यंदा मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीत दावे-प्रतिदावे, हिरवेबाजारात यंदा मतदान

77

gram panchayat election 2021 : अहमदनगर जिल्ह्यात आदर्श गाव राळेगणसिद्धी आणि हिरवे बाजारमण्सेअनेक वर्षांनी ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक होणार आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा मोडीत निघाली आहे.
आदर्श गाव ठरलेलेल्या हिरवे बाजारातून पोपटराव पवार सातव्यांदा निवणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले होते. मात्र, त्यासंबंधी एकमत होऊ शकले नाही, असे समजते.

धुळे जिल्ह्यातही ३५ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडी झाल्या. यात शिंदखेडा तालुक्यात १५, साक्री तालुक्यात ९, शिरपूर तालुक्यात ६ तर धुळेमधील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आता उरलेल्या १८३ ग्रामपंचायतीसाठी मतदान होईल.

अकोला जिल्ह्यात २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १ हजार ३१६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता २ हजार ७० जागांसाठी ४ हजार ७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वाशीम जिल्ह्यात वाशीम तालुक्यात ४, मालेगाव २, तर मनोरा, कारंजा आणि रिसोड तालुक्यातल्या प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उरलेल्या १५४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. या सर्व ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होईल, तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यात १ हजार १३ ग्रामपंचायतींपैकी १०३ ग्राम पंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. उरलेल्या ९१० ग्राम पंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान होईल.

रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ंपैकी ११९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ९ तालुक्यांमधील एकूण १ हजार ८१४ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता उरलेल्या ३६० ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. मात्र, यापैकी मंडणगड आणि राजापूर तालुक्यात प्रत्येकी ३ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्याने निवडणुका होणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here