Home उपराजधानी नागपूर पुढील चार दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस

पुढील चार दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस

84
प्रतिकात्मक छायाचित्र

RAIN IN WINTER : पुढील 3 ते 4 दिवसांत महाराष्ट्रातील मध्य भाग, मराठवाडा आणि विदर्भात मधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्याच्या दक्षिणेकडील भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील हवामान प्रामुख्याने स्वच्छ व कोरडे राहील.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचं संकट आलं आहे. जानेवारी महिन्यात ऐन थंडीच्या दिवसांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे.
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जेऊर, उस्मानाबाद, बीड, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, अमरावती आणि अकोला भागात येत्या 3 ते 4 दिवसांत हलका ते मध्यम पाऊस व गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. . या अवकाळी पावसाने एक-दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे काही पिकांना फायदा होण्यासह गारपिटीमुळे पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने [ skymet ]    वर्तवली आहे.

सूचना : ‘अभिवृत्त’ वरील बातमी प्रकाशित वा प्रसारित करताना www.abhivrutta.com असा उल्लेख अवश्य करावा.