Home राजधानी मुंबई राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चांना वेग

राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चांना वेग

101

मुंबई : ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद [ maharashtra congress president ] सोडण्याच्या तयारीत असून नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक होण्याची चर्चा तसेच आगामी निवडणुकांवर चिंतन होणार असल्याचे समजते.

वृत्तसंस्थांनुसार, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी मंगळवारी रात्री काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबरही बैठक पार पडली. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशीही चर्चा होणे आहे. याशिवाय राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांना प्रभारी पाटील भेटणार असून प्रत्येक मंत्र्याला भेटीला 15 मिनिटे वेळ दिला आहे. त्यात प्रदेशाध्यक्षपदी नवीन नाव कोणते असावे, याबाबत आढावा घेतला जाणार आहे.