दिन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत उशिरा पोचला. इंग्रजीचा तास सुरू होता़. सर ओरडले, व्हाय आर यू लेट?

टपोरी टुरकी ....Jocks for You

दिन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत उशिरा पोचला. इंग्रजीचा तास सुरू होता़.
सर ओरडले, व्हाय आर यू लेट?
मन्या म्हणाला, सर रस्त्यावर मोठ्ठा चिख्खल झाला होता. तिथं उभ्या एका बैलानं ढुस मारली. माझा पाय मोडला, म्हणून उशीर झाला.
सर पुन्हा ओरडले, टॉक ओन्ली ईन इंग्लिश.
मग मन्या बोलला, सर देयर वॉज चिखलीपिकेशन आॅन रोड. काऊज हजबँड केम. मारिंग मी शिंगडा अँड मेड मी लंगडा. सो आय कम लेट इकडा…

***

शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो.
बोडखे मास्तर : ईट केव्हा वापरतात?
संज्या : सोप्पयं, घर बांधताना…

***

दिनकर रागात आपल्या मुलाला खूप मारत होता.
शेजारी विठू काका : का मारता आहात मुलाला?
दिनकर : अहो, जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते, असं सांगितलं मी… पण हा गाढव दोन पायºया सोडून चढला…
विठू काका : अहो, मग मारता कशासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना!
दिनकर : अहो पण, चड्डी फाटली ना त्या नादात.

***

मुंबईकर : मी अंगावर गिटारचा टॅटू गोंदवून घेतलाय…?
पुणेकर : छान…मग…खाजवल्यावर वाजते का ?

***

विन्या : बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं, दोन पाय कशाला दिलेत…!
विन्या : एक किक मारायला आणि एक गिअर बदलायला.
.
.
.
बापानं लय हानला विन्याला, अशी ब्रेकिंग न्यूज आहेना राव!

***

छावी आणि बाबी दोघी बोलत असतात.
.
.
.
छावी : सांग पाहू असा कोणता पदार्थ आहे जो फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही गरम राहतो.
.
.
.
बाबी : नाही रे… तूच सांग.
.
.
.
छावी : ‘गरम’ मसाला

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *