Home नागपूर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट

49

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
गोसीखुर्द प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
त्यापूर्वी गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नागपुरातून भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे आगमन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here