Home पूर्व विदर्भ मुख्यमंत्र्यांसमक्ष सिंचन प्रशासनाकडून सादरीकरण

मुख्यमंत्र्यांसमक्ष सिंचन प्रशासनाकडून सादरीकरण

93

भंडारा : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. मोहिते आणि प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समक्ष सादरीकरण केले. येत्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरासरी दरवर्षी दीड हजार कोटी निधीची आवश्यकता आहे. पुनर्वसन करताना पुनर्वसित गावात मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी चंद्रपूर, नागपूर व भंडारा जिल्ह्यातील वितरिकांच्या कामासाठी 495 हेक्टर भूसंपादन करणे आवश्यक असून यामध्ये 96 हेक्टर सरळ खरेदीने तर 407 हेक्टर भूसंपादन भूसंपादनाच्या कायद्यानुसार कामांचे नियोजन आहे. भूसंपादनाची कार्यवाही येत्या आठ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अतिरिक्त मुख्य सचिव श्री. गौतम यांनी प्रास्ताविक केले. विविध कालावधित प्रकल्पाच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यास भविष्यातील संभाव्य अपव्यय टळू शकेल असे सांगितले.

यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, राजू पारवे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार गौतम, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजिवी प्रसाद, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.