Home अनुपमा... महिला विश्व भारतीय महिलांचं सोळा हजारी उड्डाण

भारतीय महिलांचं सोळा हजारी उड्डाण

171

भारतीय महिलांनी पादाक्रांत न केलेले फार कमी क्षेत्र उरलेले आहेत. नोकरी, रोजगार, व्यवसायासह लष्करातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. नौदल आणि वायुसेनातही प्रवेश केला आहे. आता देशातील महिला पायलट एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत. जगातील सर्वात लांब आणि आव्हानात्मक अशा सुमारे 16 हजार किमीच्या हवाई मार्गावर त्या उड्डाण घेणार आहेत. उत्तर धुव्रावरून एअर इंडियाच्या महिला कर्मचारी उड्डाण भरणार आहे. निश्चित ही संपूर्ण देशासाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.
या टीममध्ये कॅप्टन जोया अग्रवाल यांच्या नेतृत्वात पापागारी, आकांक्षा सोनवणे आणि शिवानी मन्हास यांचा समावेश असून पहिल्यांदाच पायलटची ही टीम उत्तर ध्रुवावरून उड्डाण करतील.

एअर इंडियाच्या एका अधिकाºयानुसार, उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणे खूप आव्हानात्मक आहे. विमान कंपन्या या मार्गावर अनुभवी आणि सर्वोत्तम वैमानिकांच पाठवतात.

एअर इंडियाचे विमान सॅन फ्रान्सिकोहून बंगळुरूला उड्डाण भरणार आहे. जगातील हा सर्वात लांब हवाई मार्ग समजला जातो. तब्बल 16 हजार किलोमीटरचे अंतर पार करून विमान आज 9 जानेवारी 2020 रोजी विमान बंगळुरूला पोहोचेल. पहिल्यांदाच इतक्या लांब आणि आव्हानात्मक हवाई मार्गाची जबाबदारी महिला कॅप्टनच्या हातात देण्यात आली आहे.

‘अमृता’ च्या वतीने शुभेच्छा…