Home उपराजधानी नागपूर शरद पवार यांच्या हस्ते लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन वाहनाचे लोकार्पण आज

शरद पवार यांच्या हस्ते लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन वाहनाचे लोकार्पण आज

74

नागपूर : लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन वाहनाचा लोकार्पण कार्यक्रम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात आज शनिवारी (९ जानेवारी) होणार आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत बाळासाहेब सरोदे यांचे निधन १६ जानेवारी २०२० रोजी यवतमाळ येथे झाले. विदर्भात मोठे रचनात्मक कार्य उभारणाºया निवडक लोकांमध्ये बाळासाहेब सरोदे अग्रणी होते. लोकशाही रक्षण, गांधी व विनोबा विचार, पर्यावरण, शेतकरी हक्क, निसर्गोपचार या विषयांना त्यांनी आपले जीवन वाहिले होते. याच विषयांवर महाराष्ट्रात प्रबोधन व्हावे म्हणून ज्येष्ठ व्यावसायिक विजय सेठी यांनी मारुती इको ही कार भेट दिली आहे. समाज प्रबोधनाच्या मोहिमेसाठी या वाहनाचे लोकार्पण ९ जानेवारीला पुणे येथील मार्केट यार्डमधील निसर्ग कार्यालयात सकाळी ९ वाजता आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येईल. याप्रसंगी अ‍ॅड. असीम सरोदे, विजय सेठी, मंगला सरोदे यांच्यासह पुणे, यवतमाळ आणि नागपूर येथील विविध सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रवींद्र भुसारी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here